अलिबाग मधील वीज वाहिन्या भूमीगत करण्यात येत आहेत. 
मुंबई

अलिबागमधील वीज वाहिन्या गायब होणार 

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : वादळी वाऱ्यामुळे अलिबाग शहरातील वीज वाहिन्या तुटून वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यावर मात करण्यासाठी 79 कोटी रुपये खर्चून वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. जागतिक बॅंक, केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसाह्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत हे काम करण्यात येत आहे. यासाठी 79 कोटी दोन लाख रुपये खर्च होणार आहे. 

चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वीज वाहिन्या (ओव्हरहेड वायर) आणि खांब कोसळून अनेक प्रकारे नुकसान व जीवित हानी होत असते. वीज पुरवठाही खंडित होऊन जनजीवनावर परिणामही होतो. हे टाळण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्या करण्यात येत आहेत. 

चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीच्या काही भागांतही हा प्रकल्प आहे. हे काम दोन वर्षांपासून लालफितीत अडकले होते. वनविभागाच्या परवानगीनंतर त्याला मुहूर्त मिळाला. 

धक्कादायक : गंठण चोरणारा उद्या मरेल

प्रकल्प अधिकारी सी. आर. मिश्रा यांनी सांगितले, की अलिबाग शहरातील वीज वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण होणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पर्यावरणतज्ज्ञ राजेश सोनुने यांनी सांगितले, की हे काम करताना प्रदूषण टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या असून त्यांचा अवलंब होतो की नाही याची खात्री करण्यात येणार आहे. 

वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी खोदकाम करताना स्थानिक स्वराज्य संस्थांचे दाखले घ्यावेत. त्यानंतरच या कामाची बिले द्यावीत, अशी सूचना नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि वरसोलीचे सरपंच मिलिंद कवळे यांनी केली आहे. 
 
असा आहे प्रकल्पाचा आराखडा 
अलिबाग शहर भूमिगत वीज वाहिन्या प्रकल्पासाठी 22/22 के. व्ही. अलिबाग स्वीचिंग स्टेशनचेही नूतनीकरण होणार आहे. वाहिन्यांची लांबी 27 किलोमीटर आहे. 7.9 चौरस किलोमीटर परिसरात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 118 रोहित्र, 78 आरएमयू यांचाही समावेश आहे. वाहिन्यांसाठी जमिनीखाली 0.8 ते 1.2 मीटर खोल खड्डा असेल; तर रोहित्र जमिनीपासून 1.5 मीटरवर असतील. 
 
धोका टाळण्याचा प्रयत्न 
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने देशात 13 चक्रीवादळप्रवण संभाव्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत धोके टाळण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात चक्रीवादळामुळे कमीत कमी हानी व्हावी यासाठी सशक्त पायाभूत सुविधा निर्मिती हा उद्देश आहे. त्यामध्ये अलिबाग नगरपालिका आणि बाजूच्या ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT